बिदरभावी, लोकोळी, कमशिनकोप रस्ता; नागरिकांतून संताप
खानापूर : वर्षभरापूर्वी ९९ लाख ४८ हजार रु. चा निधी खर्ची घातलेल्या बिदरभावी, लोकोळी आणि कमशिनकोप गावाला जोडणाऱ्या सहा किलोमीटर रस्त्याची दैना उडाली आहे. वर्षभरताच नागरिकांच्या वाट्याला निकृष्ट दर्जाचा खड्डेमय रस्ता आल्याने संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
नाबार्डच्या फंडातून या रस्त्यांच्या विकासासाठी ९९ लाख ४८ हजारांचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार रस्त्याचा विकास करण्यात आला, मात्र कंत्राटदाराने रस्ता काम निकृष्ट दर्जाचे केल्याने वर्षभरातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी खडी उखडल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात स्थिती आणखीनच गंभीर होणार असून त्यापूर्वी दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
———————————————————–
कित्येक वर्षे हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. रस्त्याचा विकास होऊन वर्षभरातच पुन्हा खड्डे पडल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. निकृष्ट कामाचा फटका नागरिकांना सोसावा लागत असून दुचाकीच्या अपघातात वाढ झाली आहे. त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा. – लक्ष्मण तिरविर (ग्रा. पं. सदस्य बिदरभावी)
Belgaum Varta Belgaum Varta