खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
नुकताच जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग आठ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल 100 टक्के लागले याबद्दल संस्थापक विठ्ठलराव हलगेकर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीच्या परिक्षेत ऋतुजा गुरव हिने 96.2 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. तर पोर्णिमा लखमोजी हिने 95 टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक तर नीलम पाटील हिने 94.4 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सौम्या बुदनूर व झेन येस्लावत 92.4 टक्के, प्रणाली पाटील 91.8 टक्के, ओमश्री खांबले 90.4 टक्के, श्रेया पत्तार 90टक्के, श्री हरी पाटील 89.8 टक्के, एम मनिष 89.2 टक्के, अंकिता दोड्डलक्कनवर, 87.2 टक्के, अक्षता शिपारमटंटी 87 टक्के, समृध्दी गडाद 86.8 टक्के हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूलने 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याने तालुक्यात अभिनंदन होत आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे सचिव प्रा. आर. एस. पाटील, संचालक मंडळ, प्राचार्या व शिक्षकवर्गानी अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta