Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर आरोग्य विभागाला मराठीचा विसर

Spread the love

खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात मराठीला डावलण्याचा प्रकार घडल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या तालुका सरकारी दवाखान्यालाही मराठीची कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकावर मराठीला डावलून केवळ एकाच भाषेला स्थान देण्यात आल्याने मराठी भाषिक नागरिकांची गैरसोय होत आहे.

सरकारी दवाखान्याच्या अंतर्गत भागाचे नूतनीकरण केले जात आहे. माता आणि शिशु इस्पितळाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. मोफत उपचारांमुळे मोठ्या संख्येने रुग्ण सरकारी दवाखान्यावर अवलंबून राहतात. त्यामुळे किमान दवाखान्यासारख्या अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी भाषाभेद बाजूला ठेवून समान वागणूक अपेक्षित असते. पण सरकारी दवाखान्याच्या दर्शनी बाजूवर बसवण्यात आलेल्या नाम फलकावरुन मराठीला सोयीस्कररित्या वगळण्यात आल्याने मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नुकताच तहसीलदार कार्यालयाच्या नामफलकाचे नूतनीकरण करताना केवळ कन्नड फलकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मराठी फलकाला जैसे थे ठेवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आरोग्य विभागालाही मराठीचा विसर पडल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.
काही महिन्यांपूर्वी मराठीतून दिले गेलेले अर्ज स्वीकारणार नसल्याचा फतवा एका तालुकास्तरीय अधिकार्‍याने काढला होता. अनेक सरकारी कार्यालयात नियमानुसार कन्नड बरोबर मराठीतून माहिती देण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. तथापि आरोग्य विभागाने मराठीलाही स्थान द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *