खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) गावची कन्या श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीची विद्यार्थीनी ऋतुजा लक्ष्मण गुरव हिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९६.२ गुण घेऊन शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही १००टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यानिमित्ताने तोपिनकट्टी आजी – माजी शिक्षक ग्रुपच्यावतीने नुकताच सत्कार सोहळा तोपिनकट्टीत त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड यानी तोपिनकट्टी गावची कन्या दहावी परीक्षेत ९६.२ टक्के गुण घेऊन गावचे नाव उज्ज्वल केल्याबदल तिचे अभिनंदन केले.
यावेळी शिक्षकाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुप्षहार व भेटवस्तू देऊन तसेच पेढा भरवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना ऋतुजा गुरव म्हणाली की, शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे संस्थापक श्री. विठ्ठलराव हलगेकर, सचिव प्रा. आर. एस. पाटील, संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्या तसेच शिक्षकवर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई वडिलांचे सहकार्य ही लाभले. त्यामुळे हे यश मिळू शकले.
यावेळी वडील – शिक्षक श्री. लक्ष्मण गुरव, आई शिक्षिका सौ.रोहिणी गुरव, निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड, शिक्षक महादेव बांदिवडेकर, के. जे कुंभार, नारायण करंबळकर, वैजू गुरव, मुख्याध्यापक डी. व्ही. कुंभार, हणमंत करंबळकर आदी शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta