खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या अध्यक्षपदी दयानंद वाणी तर उपाध्यक्षपदी सौ. स्वाती भांतकांडे यांची निवड केली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर होते.
प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मुख्याध्यापक एस. एम. पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून एसडीएमसी रचना याबद्दल माहिती दिली.
यावेळी अध्यक्ष पदासाठी दत्तात्रय वाणी यांनी दयानंद वाणी यांचे नाव सुचित केले. तर उपाध्यक्ष पदाचे नाव निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी सौ. स्वाती भातकांडे यांचे नाव सुचित केले.
याचबरोबर सदस्य पदी मुकुंद पाटील, दत्तात्रय वाणी, सातेरी बैलूरकर, मोतापा गावडे, अनंत गुरव, मष्णू पाटील, संजय भातकांडे, दौलत गुरव, सदस्या पदी मनिषा पाटील, मनिषा कुदळे, श्वेता भातकांडे, सविता पाटील, राजश्री वाणी, जयश्री गांवकर, पुजा पाटील, रेणूका बैलूरकर आदींची निवड करण्यात आली.
यावेळी कन्नड शिक्षक मकोजी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta