खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका शिवसेनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेचा वाढदिवस दिवस येथील बरगाव फाट्यावरील के. पी. पाटील सभा गृहात बुधवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाला तालुका महिला शिवसेना अध्यक्षा एलन बोर्जिस, नारायण राऊत, मोहन गुरव, गणपत गावडे, मारीयान बोर्जिस, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्नाटक राज्य शिवसेनेचे उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुक्यात शिवसेना पक्षाला बळकटी आणण्यासाठी राज्य उपाध्यक्ष या नात्याने मी प्रयत्नशील आहे. तालुक्यातील गावोगावी शिवसेना कार्यकर्त्यांची फळी उभारून पक्ष वाढविण्यासाठी माझे सदैव प्रयत्न राहतील, असे सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवराना पेढे वाटून व केक देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गणपत गावडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta