खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मराठी शाळेत
2023 ते 2025 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नुतन शाळा सुधारणा समितीची निवड नुकताच करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक गिरी उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माझी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व उपाध्यक्ष अशा गावडे व इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलांच्या स्वागतगीताने झाली. तर उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक व्ही. एफ. सावंत यांनी केले.
यावेळी शिक्षक टी. बी. मोरे, विवेक गिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एसडीएमसीच्या अध्यक्ष पदी धाकलु गुरव तर उपाध्यक्षा पदी मंगल गुरव यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी टोपाण्णा गुरव, पुंडलिक लोंढेकर, संभाजी गुरव, नामदेव मिसाळ, शटवाजी गुरव, भुजंग गुरव, हंबीरराव कोलेकर, सदस्यापदी सुमित्रा बजंत्री, रूपाली सुतार, सुधा गुरव, नमिता गुरव, गौतमी गुरव, शीतल भातकांडे, श्वेता उशीणकर, पुजा नाईक याची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जे. पी. पाटील यांनी केले तर आर. एम. लोहार यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta