खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील जांबोटीवाड्यात नवीन अंगणवाडीचे उद्घाटन नुकताच करण्यात आले.
आरडीएफ योजनेअंतर्गत१७ लाख रूपये अनुदानातून खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.
प्रारंभी खानापूर बालकल्याण खात्याचे अधिकारी सीडीपीओ राममूर्ती के. व्ही. यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सुपरवायझर मंजुळा कुलकर्णी अंगणवाडीबद्दल माहिती दिली.
यावेळी सीजीपी राममूर्ती के. व्ही. म्हणाले की, खानापूर तालुक्यात आरआयडीएफ योजनेंतर्गत १७ लाख अनुदानातून १११ खोल्या उभारण्यात आल्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावच्या अंगणवाडी इमारतीचा प्रश्न मार्गी लागला. जांबोटी भागातील इमारतीचा गंभीर प्रश्न होता. कारण अति पावसाचा भाग असल्याने इमारती कोसळल्या जात होत्या. त्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या दूर झाली.
कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व शिक्षण प्रेमी, नागरिक उपस्थित होते.
आभार सुपरवायझर मंजुळा कुलकर्णी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta