खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने नुतन बीईओ राजश्री कुडची यांचे स्वागत बीईओ कार्यालयात नुकताच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय्. एम्. पाटील होते. तर प्रमुख अतिथी कर्नाटक राज्य नोकर संघाचे तालुकाध्यक्ष बी. एम्. येळ्ळूर हे होते.
यावेळी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे प्रधान कार्यदर्शी एम्. आर. चवलगी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर नुतन बीईओ राजेश्वरी कुडची यांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागतपर सन्मान करण्यात आला. तसेच शारीरिक शिक्षणाधिकारी श्रीमती मिर्जी, शिक्षण संयोजक श्रीमती लोकापुरे, कार्यालयाचे अधीक्षक वाघमारे, मल्लेशगौडा व खानापूर केंद्राचे समूह संपन्मूल व्यक्ती जनकट्टी आदीचे स्वागत करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. नेगिनहाळ, गौरवाध्यक्ष श्री. ए. आर. बळगप्पनावर, कर्नाटक राज्य नोकर संघाचे अध्यक्ष श्री. बी. एम्. येळ्ळूर, महिला उपाध्यक्षा श्रीमती ए. बी. देसाई, श्रीमती गुर्लहोसूर, श्रीमती मिर्जी, श्रीमती लोकापुरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बीईओ राजेश्वरी कुडची यांनी शिक्षक संघटनेसह सर्व शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शिक्षकांनीही समयपालनासह कर्तव्यनिष्ठेने आपली सेवा बजावावी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. शेवटी अध्यक्षीय समारोपासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सूत्रसंचलन संचालक पी. जी. पाखरे यांनी केले व आभार संचालक . एस्. एल्. हळदणकर यांनी मानले. कार्यक्रमाला संघटनेचे खजिनदार के. आर. पाटील, महिला संघटना कार्यदर्शी श्रीमती जी. सी. गुर्लहोसूर, संचालक श्री. आय्. जे. बेपारी, श्रीमती अर्चना पाटील यांसह संघटनेचे नामनिर्देशित संचालक विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta