खानापूर (प्रतिनिधी) : आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून आपली प्रगती साधावी. या उद्देशाने शेतात भात पिकाला ड्रोनव्दारे नॅनो युरीयाखताच्या फवारणी ची प्रात्यक्षिके जांबोटीत (खानापूर) येथे कृषी खात्याच्यावतीने दाखविण्यात आली.
यावेळी आमदार निंबाळकर, कृषीखात्याचे उपसंचालक एच. डी. कोळेकर, खानापूर कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण, एस. एस. पवाडी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण म्हणाले की, ड्रोनव्दारे नॅनो युरीया खताची फवारणी करताना एक एकर जमिनीतील भात पिकासाठी १० लिटर पाण्यात अर्धा लिटर युरीयाखताच्या लिक्वडचा वापर करून फवारणी करता येते.
फवारणी करतेवेळी शेतकर्याला कोणत्याच प्रदुषणाचा त्रास होणार नाही. शिवाय फवारणीमुळे पिकाला कोणत्याच प्रकारच्या कमी जास्त प्रमाणाची औषध फवारणी होणार नाही. या फवारणीमुळे संपूर्ण पिकाला औषध फवारणीचा लाभ होऊ शकतो. कमी वेळेत जास्त फवारणी केली जाते.
याचबरोबर किटकनाशक फवारणीसाठी याचा उपयोग होतो.
तेव्हा शेतकऱ्यांनी ड्रोनव्दारे नॅनो युरीया खताच्या फवारणी वापर करून शेतीची प्रगती साधावी, असे आवाहन केले.
यावेळी ड्रोनव्दारे नॅनो युरीया खताच्या फवारणीचा शुभारंभ कृषी खात्याचे उपसंचालक एच. डी. कोळेकर यांच्याहस्ते करण्यात आला.
कृषीअधिकारी डी. बी. चव्हाण यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta