
खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी येथील सर्व शाळांमध्ये मा. आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे आज वितरण करण्यात आले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षक यांच्याशी संवाद साधला. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्यांना शुभेच्छा दिल्या. माध्यमिक शाळेतील मुलींसोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी सर्व शाळांचे शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्य, सामजिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta