Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर तालुक्यात कुंभार समाजाकडून नागपंचमीसाठी नागमुर्ती तयार

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे दरवर्षी होणार्‍या नागपंचमी सणासाठी खानापूर तालुक्यातील कुंभार समाजाकडून नागमुर्ती तयार केल्या जातात व घरोघरी या नागमुर्तीची मनोभावे पुजा केली जाते.
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी, सिंगीनकोप, तोपिनकट्टी, निट्टूर, गणेबैल, नंदगडसह अनेक गावातील कुंभार समाज नागपंचमीसाठी शेडू व काळी मातीचे मिश्रण करून त्या चिखलातून सुरेख अशा शेडूमिश्रीत मातीचे नाग तयार करतात.
कुंभार समाजात वडिलोपार्जित कुंभार व्यवसाय व त्याचबरोबर नागमुर्ती तयार करण्यात येतात. यासाठी शेडूमिश्रीत काळ्यामातीचे मिश्रण करून तो चिखल केला जातो. त्यानंतर साच्यात घालुन नागमुर्ती तयार केल्या जातात. सुरेख नक्षीकाम करून त्यांना रंगकाम केले जाते. यावेळी कुंभार समाजातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून नागमुर्ती तयार करण्यास मदत होते.
सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील मंदा कुंभार यांनी तयार केलेल्या नागमुर्तीना रंगकाम केले. या नागमुर्तीच्या किमती रंगाची किंमत वाढल्याने दिवसेंदिवस किमतीत वाढ झाली आहे.
सर्वात लहान नागमुर्तीची किंमत 30 रूपयांपासून ते मोठ्या नागमुर्तीची 90 ते 100 रूपये किमती आहेत. नागमुर्ती नक्षीकाम केलेल्या असतील वेगवेगळ्या आकाराच्या असतील तर किमतीत वाढ केली जाते.
या नागमुर्ती खानापूर, बेळगाव आदी शहरात विक्रीसाठी पाठविल्या जातात. बाजारात बसून नागमुर्तीची विक्री केली जाते. त्यामुळे कुंभार समाजाच्या कुटुंबाच्या संसाराला चार पैसे मिळुन जातात. सध्या कुंभार समाजाच्या घरोघरी नागमुर्ती तयार करण्याचे काम जोर आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *