खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या मिरज ते लोंढा, हुबळी मार्गावरील रेल्वे पुन्हा 25 ऑगस्ट व 26 ऑगस्टपासून धावणार आहेत. या एक्सप्रेस असल्यातरी आरक्षित नाहीत त्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
मिरज-लोंढा-मिरज 07251 व 07352 या क्रमांकाची रेल्वे मिरजहून 25 ऑगस्टला तर लोंढ्यातून 26 ऑगस्टपासून धावणार आहे. दररोज सायंकाळी 7 वाजता मिरजहून निघून बेळगावला 10.05 मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच लोंढा येथे 11.55 वाजता येणार. लोंढ्यातून सकाळी 5 वाजता निघणार व 6.10 वाजता बेळगावला व मिरजेला सकाळी 9.24 मिनीटांनी पोहोचणार आहे.
मिरज – केसलरॉक – मिरज 17333 व 17334 या क्रमांकाची रेल्वे 26 ऑगस्टपासून रोज सकाळी मिरजहून 10.15 ला निघून दुपारी 1.25 वाजता बेळगांवात तर 4.30 वाजता पोहोचणार आहे. केसलरॉकमधून सायंकाळी 5 वाजता निघून 7.10 वाजता बेळगावात व 8.30 ला मिरजेला पोहोचणार आहे.
हुबळी-मिरज-हुबळी 17322 व 17331 ही रेल्वे हुबळी पासून 25 ऑगस्ट तर मिराजहून 26 ऑगस्टला धावणार आहे. हुबळीहून सकाळी 10.30 ला निघून दुपारी 2.40 वाजता बेळगाव तर संध्याकाळी 6.30 वाजता मिरजेला पोहोचणार. मिरजहून सकाळी 6.10 वाजता निघून 9.45 बेळगावात तर दुपारी तीन वाजता हुबळीला पोहोचणार आहे. सद्या बेळगावातून एकच पॅसेंजर सुरु असल्याने या गाड्या सुरू झाल्यास अनेक प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta