
खानापूर (विनायक कुंभार) : चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलचे सहशिक्षक एन. एन. दलवाई यांच्या सेवानिवृत्त सोहळा श्री. पिराजी कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी शांतिनिकेतन संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, शिक्षक निवृत्त होतो फक्त सेवेतून, शिक्षकीपेशातून कधीच निवृत्त होत नाही. त्यांच्या सेवेतील अनुभव वारंवार समाजाला घडवत असतात. यासाठी समाज सेवा अंगीकृत केले पाहिजे जेणेकरून इतक्या वर्षातील अनुभव सार्थ होतो. त्यांच्या भावी आयुष्यसाठी शुभेच्छा संदेश देऊन प्रयत्न पूर्वक आनंददायक वातावरणात असलेल्याच्या स्वाक्षरीने त्यांना निरोप देणं म्हणजे त्यांच्या कार्याची पोच पावती आहे, असे गौरवोद्गार व्यक्त केले.
तसेच दक्षिण महाराष्ट्र मंडळ शिक्षण संस्थेचे सचिव विक्रम पाटील यांनी त्यांच्या सेवेतील काही महत्वाचे क्षण व्यक्त केले त्यात त्यांनी दोन वेळा कर्नाटक शासनाकडून मिळवलेल्या प्रशस्ती पत्राचा आवर्जून उल्लेख केला की, मराठी माध्यमातून कन्नड विषयात राज्यात प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांनी मिळवला याचे श्रेय फक्त दलवाई सरांना जाते, असे गौरवोद्गार काढले. अध्यक्षीय भाषणात पिराजी कुराडे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या सेवेची पोच पावती देताना 60 वर्षे पूर्ण झाली म्हणजे निवृत्ती झाली असे न म्हणात आता त्यांच्या समाजसेवेला सुरवात झाली असे म्हणावं लागेल. त्यांनी आता पुढील वाटचालीत आजपर्यंतचा अनुभव समाजातील पिढीसाठी अर्पण करतील यात तिळमात्र शंका नाही. आजपर्यंतच्या त्यांच्या निस्वार्थ सेवेची पोच पावती आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या शाळामध्ये 33 वर्षे सेवा केली तसेच खेळामध्येही त्यांचा सहभाग मोलाचा होता. यानंतर विविध संघ, संस्था, आजी माजी विद्यार्थ्यांकडून त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, गावकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta