खानापूर (विनायक कुंभार) : मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाती घेण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे.
खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक सोमवारी शिवस्मारक येथे झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सरकारी कागदपत्रे व परिपत्रके ही कन्नड भाषेबरोबर मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखीलही मिळत नाहीत. कर्नाटक सरकारचा भाषिक अल्पसंख्याक 1981 च्या कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यात कानडी भाषिकांबरोबर इतर भाषिक 15% पेक्षा अधिक असतील तर कन्नड बरोबरच त्यांच्या भाषेतही सरकारी परिपत्रके व कागदपत्रे मिळाली पाहिजे. जिल्ह्यात मराठी भाषिकांचे प्रमाण 21% आहे. तालुक्याचा विचार तर बेळगांव, खानापूर, चिक्कोडी, अथणी या तालुक्यात मराठी भाषिकांचे प्रमाण 60% पेक्षा जास्त आहे. अल्पसंख्याक कायद्यानुसार पत्रके मिळावी म्हणून मराठी भाषिकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयानेही मराठी भाषेत परिपत्रके मिळावीत असा आदेश देण्यात आला. असे वेळोवेळी कर्नाटक प्रशासनाला सूचित केले आहे. परंतु या आदेशकडे जिल्हा प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. आणि या आदेशाची अमलबजावणी झाली नाही. यासंदर्भात 27 जून 2022 रोजी मराठी भाषिकांनी बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा मागणी केली होती. 0परंतु या मागणीची दखल घेण्यात आली नसून कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणुन या अन्यायाविरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 8 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे (ठिय्या) आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला पुन्हा एकदा मराठी बाणा दाखवावा, असे समितीकडून आवाहन करण्यात आले.
यावेळी आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, विलास बेलगावकर, अनिल पाटील, मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta