खानापूर (प्रतिनिधी) : आंबोळी (ता. खानापूर) येथील मराठी प्रौढ प्राथमिक मराठी शाळेत नवीन एसडीएमसी कमिटीची निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम सदस्या सौ. लक्ष्मी ओमाणा नाईक होते.
यावेळी बैठकीला ग्राम पंचायत सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत एसडीएमसी कमिटीची निवड होऊन अध्यक्षपदी अर्जुन अप्पी नाईक यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सौ. वंदिता विष्णू चोर्लेकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीत माजी ग्राम पंचायत सदस्य शंकर शास्त्री तसेच माजी एसडीएमसी सदस्य ओमाण्णा नाईक यांनी शाळेच्या विकासासाठी कोणती कामे केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. तर बी. बी. सरावरी यांनी एसडीएमसी कमिटीची कर्तव्ये कोणती याबद्दल माहिती दिली.
यावेळी सदस्य धाकलू नाईक, संजय शास्त्री पाटील, रामचंद्र पाटील, नारायण नाईक, तानाजी शास्त्री, नंदू चोर्लेकर, मोहन नाईक, किरण नाईक, सदस्या सौ. रूपाली शास्त्री, सौ. पार्वती दळवी, अश्वनी शास्त्री, राजश्री नाईक, गीता नाईक, वंदना नाईक, लक्ष्मी तळवार, संजना नाईक आदी उपस्थित होते. शेवटी आभार सौ. विना कुंदेकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta