खानापूर : उद्या तारीख 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक या ठिकाणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या वतीने सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत यासाठी व कन्नड सक्ती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच पर्यंत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. याबाबत व तालुक्यातील इतर समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका समितीच्या वतीने शिवस्मारकामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले तरी तालुक्यातील सर्व समिती कार्यकर्त्यानी, आजी-माजी लोकप्रतिनिधीनी व समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे, अशी विनंती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta