खानापूर (विनायक कुंभार) : अवरोळी येथील मठात 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचा 85 इंचाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. नकाशाच्या मध्यभागी 75 इंच उंचीचा भारतमातेचा पुतळाही तयार करण्यात आला आहे. हि मूर्ती देशप्रेमीसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सकाळी 9 वाजता या मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडणार आहे, असे मठाचे चनबसव देवरू यांनी सांगितले. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसह तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta