खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे तीन वर्षांनी एकदा होणारी श्रीमाऊली देवीची यात्रा शुक्रवारी दि. १९ ते मंगळवारी दि. २३ ऑगस्टपर्यंत असे पाच दिवस होणार आहे, असा निर्णय तोपिनकट्टी पंच कमिटीच्या बैठकीत शुक्रवारी दि. ५ रोजी घेण्यात आला. यावेळी बैठकीला माजी ग्राम पंचायत अध्यक्ष नारायण शंकर गुरव, उपाध्यक्ष मारूती गुरव, सदस्य शिवाजी करंबळकर, चंद्रापा गुरव, आप्पा हलगेकर, भरमाणी तिरवीर, यल्लापा तिरवीर, पुंडलिक गुरव, कृष्णा गुरव, परशराम गुरव, यल्लापा गुरव, परशराम तिरवीर, परशराम द्रोपदकर, चागापा गुरव, लक्ष्मण तलवार, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तोपिनकट्टी गावात वडिलोपार्जित गेल्या कित्येक वर्षांपासून तीन वर्षातून एकदा माऊली देवीची यात्रा साजरी केली जाते.
या यात्रेनिमित्त मंगळवार व शुक्रवार या दिवशी पार पाळले जातात.
तर शुक्रवारी दि. १९ रोजी सकाळी १० वाजता गावात गाऱ्हाणे घालुन गावची वेस (सीमा) बांधली जाते. या पाच दिवसात तोपिनकट्टी गावात बाहेरील कोणतीही व्यक्ती, पै, पाहूणा, नोकरवर्ग आदीना प्रवेश करणे बंधनकारक आहे. तसेच गावातील नागरीकांना गावच्या बाहेर जाता येत नाही. या काळात गावातील दळपकांडप गिरण्या बंद ठेवतात. चार चाकी वाहने, दुचाकी वाहने गावात फिरत नाही.
यापाच दिवसामध्ये गावच्या बाहेर माऊली देवी बसविल्या जातात. दररोज संध्याकाळी याठिकाणी जत्रा भरली जाते. या ठिकाणी गावच्या सर्व लोकांच्या उपस्थित पुजाअर्चा केली जाते.
शेवटच्या दिवशी वाद्याच्या गजारात संध्याकाळी गावच्या सीमेवरती माऊली देवीची पूजा केली जाते. रात्री १० वाजता गोंधळाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या पाच दिवसात वार पाळुन बाहेरील कोणतेही रोगराई येऊ नये. यासाठी ही प्रथा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta