खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात चार अंगणवाडी शिक्षिका व अकरा मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी18 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांनी अर्ज करावा असे महिला आणि बाल कल्याण खात्याकडून सांगण्यात आले आहे. बांदेकरवाडा, शिंपेवाडी, मुडेवाडी व ओलमनी या गावातील केंद्रामध्ये शिक्षिका तर हाळझुंजावड (नांजिंकोंडल) मुगलिहाळ, हत्तरवाड, गुंडपी, चिगुळे, हेब्बाळ, डोंगरगाव, मोदेकोप, मेंढेगाळी, रुमेवाडी क्रॉस आणि करंबळ गावातील अंगणवाडी केंद्रात मदतनीस या पदासाठी स्थानिक पात्र महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. 5 सप्टेंबर हा दिवस अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. अर्जाची अधिक माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्राशी किंवा महिला आणि बालकल्याण तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सीडीपीओ के. व्ही. राममूर्ती यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta