Tuesday , March 3 2026
Breaking News

मुसळधार पावसाने नंदगडात गटारी तुंबल्या, गटारीचे पाणी दुकानात!

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावच्या नंदगड- हलशी स्टॅन्ड जवळील दुकानांमध्ये नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले. त्यातच गटार तुंबल्याने गटारीचे पाणी नंदगडमधील कलाल गल्लीतील हलशी स्टँड जवळील बाळेकाइ बंधूंच्या दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे त्यांच्या दुकानाच्या व्यापारामध्ये परिणाम झाला.
याचा मनस्ताप दुकानदार मालकाला सहन करावा लागला. नंदगडमधील बाजारपेठ व रेमनु गल्ली अशा बऱ्याच भागातील पावसाचे पाणी या गटारीमधून वाहते. नुकताच मोठा पाऊस झाल्यामुळे या गटारी तुंबल्यामुळे संपूर्ण पाणी दुकानात साचले होते. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन गटार मोकळी करून ही अडचण दूर करावी, अशी मागणी सर्व थरातुन होत आहे.
नंदगड ग्रामपंचायतीला देशातील चांगली ग्राम पंचायत पुरस्कार मिळाला आहे. मात्र गटारीचा विकास हा असा आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *