खानापूर (विनायक कुंभार) : सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराला महसूल विभागाकडून कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. महसूल विभाग हे अतिसंवेदनशीलतेची भूमिका बजावत असते. त्याच्या विरोधात येथील महिलेने सरकारी अधिकाऱ्यांना भावनिक आवाहन करून पडझड झालेल्या घराचा पुन्हा एकदा पंचनामा करून घर देण्याची मागणी केली.
केरवाड (ता.खानापूर) ग्रामपंचायत क्षेत्रातील हंदूर येथील शोभा हिरेमठ यांचे घर दोन महिण्यापूर्वी झालेल्या पावसात कोसळले आहे. सरकारच्या आपत्ती निवारण निधीतून घर मंजूर देण्यासाठी अधिकाऱ्यांना कित्येक वेळा विनवणी केली. तहसीलदार कार्यालयाला हेलपाटे मारले. शोभा हिरेमठ यांचे कुटुंब रोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे पडझड झालेल्या घराची पुन्हा एकदा पाहणी करून नवीन घर बांधण्यासाठी योग्य ती भरपाई देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta