खानापूर (विनायक कुंभार) : शहरा लगतच्या शिवाजी नगरातून खानापूर-जांबोटी रोड जातो. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी गतिरोधकांची मागणी होत आहे. महिनाभरात शिवजीनागरात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नगरात प्रवेश करताना रेल्वे बोगदा उतरताना उतार आहे. तर दुसऱ्या बाजूने जांबोटी क्रॉसपासून उतार आहे. त्यामुळे अवजड तसेच इतर वाहनांच्या चालकांचा ताबा राहत नाही. या परिसरात दवाखाना, किराणा दुकानासह इतरही दुकाने व प्राथमिक शाळा असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे भरधाव वाहनांचा धोका वाढतो आहे. त्याकरिता त्वरित याठिकाणी गातिरोधक बांधण्याची मागणी केली जाते आहे.
Belgaum Varta Belgaum Varta