खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेत एसडीएमसी कमिटीचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते.
यावेळी शिक्षण प्रेमी ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या माया कुंभार, ओमाणा पाटील, मोहन कुंभार, नागेश पाटील बाळू पाटील चितामणी तिरकणावर, परशराम कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत पी. के. सुतार यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडे यांनी एसडीएमसी कमिटीच्या सत्काराबदल माहिती दिली.
प्रारंभी ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. व पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी सत्कार मुर्ती एसडीएमसी कमिटीचे नुतन अध्यक्ष विश्वनाथ अर्जून पाटील, उपाध्यक्षा चित्रा कुंभार, सदस्य नागेश कुंभार, सोमनाथ मादार, परशराम पाटील, मोहन कुंभार, एन. डी. पाटील, विनायक कुंभार, परशराम प्रभाकर पाटील, तर सदस्या शालन पाटील, ललिता पाटील, लक्ष्मी कोलकार, मोहिनी कुंभार, माधुरी कुंभार, राजश्री पाटील, स्वाती कुंभार, वैशाली पाटील आदीचा पाहुण्याच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला
तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधुन माजी एसडीएमसी अध्यक्ष धोंडीबा कुंभार व निवृत्तमुख्य स्वयंपाकीनी सौ. लिला शंकर कुंभार यांचा साडी चोळी, शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नुतन एसडीएमसी कमिटीबदल धोडींबा कुंभार, ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, तसेच मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडी, यानी मार्गदर्शन केले.
यावेळी पालक, शिक्षण प्रेमी, गावचे पंच कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. के. सुतार यांनी केले.
शेवटी आभार अतिथी शिक्षक नामदेव कुंभार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta