खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची सन १९५७ साली बांधलेली कौलारू इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली.
गेल्या दोन महिन्यापासून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये वर्ग चालविण्यास विरोध केल्याने पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग गावच्या समुदाय भवनात, तसेच जवळ असलेल्या कन्नड प्राथमिक शाळेत भरविण्यात येत आहेत.
सिंगिनकोप लोअर प्राथमिक मराठी शाळेची तीन खोल्यांची कौलारू इमारत होती. यातीन वर्गात पहिली ते पाचवी पर्यतचे वर्ग भरविले जात होते.
या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ४२ असुन सर्व विद्यार्थी नियमितपणे हजर असतात.
गेल्या आठवडाभर खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने कहर माजला आहे.
त्यामुळे सिंगीनकोप लोअर प्राथमिक मराठी शाळेची इमारत पावसामुळे जमीनदोस्त झाली. ऐन पावसाळ्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी गावभर फिरण्याची वेळ आली आहे. तेव्हा तालुक्याच्या आमदार डाॅ. अंजली निंबाळकर यांनी शाळेच्या इमारतीसाठी निधी मंजुर करून विद्यार्थ्याची सोय करावी, अशी मागणी एसडीएमसी कमिटी, गावची पंच मंडळी व शिक्षण प्रेमीतुन होत आहे.
तेव्हा संबंधित शिक्षण खात्याच्या खानापूर तालुक्याच्या बीईओअधिकरी राजेश्वरी कुडची यांनी नुतन इमारतीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta