खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर ) येथील ग्राम पंचायतीचे पीडीओ श्री. देसाई, सिंगीनकोप गावचे ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या सौ. माया कुंभार आदीनी नुकताच मुसळधार पावसामुळे सिंगीनकोप लोअर प्राथमिक मराठी शाळेची तीन वर्ग खोल्याची कौलारू इमारत कोसळून जमिनदोस्त झाली. याची दखल घेऊन लागलीच भेट देऊन पाहणी केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडी यांनी माहिती सांगताना म्हटले की, सन १९५७ इमारतीची उभारणी करण्यात आली होती.
दिवसेंदिवस इमारतीची आवस्था गंभीर होत होती. त्यामुळे जुन महिन्यापासून विद्यार्थ्यांना इमारतीत बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पहिली ते पाचवी पर्यंतच्या ४२ विद्यार्थ्यांना गावातील समुदाय भवन, गावच्या मंदिरातून बसविण्यात येत आहे. तेव्हा इदलहोंड ग्राम पंचायतीच्या पीडीओ श्री. देसाई यानी नविन इमारत मंजुर करण्यासाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांची गैरसोय दुर करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी एसडीएमसी कमिटीचे सदस्य एन. डी. पाटील, शाळेची शिक्षक पी. के. सुतार, अतिथी शिक्षक नामदेव कुंभार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta