खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या, नाल्याना पाण्याचा प्रवाह वाढल्याने गेल्या दोन दिवसापासून खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने शिरोली, शिरोलीवाडा, हेम्माडगा, डोगरगांव, नेरसा, अशोकनगर आदी भागातील जवळपास २५ खेड्याचा संपर्क खानापूर शहराशी तुटला त्यामुळे हायस्कूल, काॅलेजच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या मार्गावरील बससेवा व इतर वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. या भागातील म्हादाई नदीच्या खोऱ्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्याची पातळी वाढली आहे. तेव्हा खानापूर प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta