
खानापूर (विनायक कुंभार) : तोपिनकट्टी ग्रा. पं. क्षेत्रातील बिदरभावी येथे घराची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. लक्ष्मी विनोद पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे.
लक्ष्मी या सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक त्यांच्या अंगावर भिंत कोसळून त्या खाली सापडल्या. गावकर्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढून खानापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सदर घटनेची माहिती मिळताच पीडिओ व तलाठी यांनी पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली.
Belgaum Varta Belgaum Varta