खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी मोटरसायकलवरून जनजागृती रॅलीचे नियोजन करण्यात आले.
पणजी – बेळगांव महामार्गावरून शिवस्मारकातून रॅलीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुक्याचे दंडाधिकारी प्रविन जैन, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खानापूर शहरातील स्टेशन रोड, बाजारपेठ, देसाई गल्ली, चिरमुरकर गल्ली, विठोबा गल्ली, पारिश्वाड रोड, जांबोटी क्रॉसवरून मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta