खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील प्रसिद्ध क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधीचा परिसर खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून स्वच्छ करण्यात आला.
यावेळी समाधीच्या आवारातील पालापाचोळा, कचरा काढून टाकण्यात आला. फरशी झाडून पुसून स्वच्छ केली. क्रांतीवीर संगोळी रायण्णाच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, बेळगांव जिल्हा भाजप उपाध्याक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील, माजी भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, जोतिबा रेमाणी, राजेंद्र रायका, बसू सानिकोप, आदी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta