खंडित वीजपुरवठ्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील नागरागाळी भागातील अनेक गावांत गेल्या 5 ऑगस्टपासून वादळी पावसामुळे विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे येथील परिसरात लोकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
तालुक्यातील नागरगाळी, बामनकोप, कृष्णानगर, कुंभार्डा, तारवाड, कोडगई, सुवतवाडी, चिंचेवाडी, मुंडवाड, पिंपळे, मांजरपै, माचाळी, सतानाळी, शिवठाण, शिंदोळी बी के, शिंदोळी के एच या गावात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे या परिसरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीज पुरवठा नसल्याने सर्व बोरवेल बंद आहेत. नाले, झरे यातील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने सध्या पावसाचे पाणी उकळून पिण्याची वेळ आली आहे. यामुळे आरोग्यच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाय होणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांतून आहे.
Belgaum Varta Belgaum Varta