खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर शहरातील पोलीस ठाण्यात नेहमीच अपघात, आत्महत्या, खून आशा घटना घडल्या की कोणत्याही वेळी आपली ट्रॅक्स घेऊन सेवेला हजर राहणारे समाजसेवक म्हणून सदानंद तुकाराम काद्रोळकर हे वयाच्या 77 वर्षे आपली सेवा प्रामाणिकपणे करतात. तालुक्यात कुठेही अपघात घडला, कुठेही खून झाला, कुठेही आत्महत्या केलेल्या मृतदेह राहूदे खानापूर पोलिसांनी फोन केला तर त्यांच्या सेवेला क्षणाचाही विलंब न करता आपली ट्रॅक्स घेऊन ते आजही हजर राहतात. सदानंद काद्रोळकर हे 1981 सालापासून अशी खानापूर तालुक्यात सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेला कशाचीच जोड नाही. पोलीस रात्री अपरात्री घटना घडताच फोन केला तर ते तत्परतेने आपली गाडी काढतात आणि सेवा बजावतात एवढेच नव्हे तर कोविड काळात पोलीस खात्याला बहुमोल सहकार्य केले आहे. सदानंद काद्रोळकर हे आज 77 वर्षाचे आहेत. त्यांचे मूळगाव कारलगा असून ते नंदगड, हलशी, खानापूर या भागात ते आपली सेवा करतात. त्यांच्या या सेवेबद्दल खानापूर तालुक्यातून तालुक्यातून त्यांच्या कामाबद्दल गौरव होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta