खानापूर (प्रतिनिधी) : मुळच्या करंबळ (ता. खानापूर) गावच्या कन्या व सध्या गोवा येथील नारायण नगर होंडा सत्तरी येथे स्थायिक असलेले विद्यानंद नार्वेकर यांच्या मुली कु. संजना व कु. विजेता या दोघींनी गोव्यातून स्विमींग (पोहणे) या क्रिडा प्रकारात राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांची भारत सरकारच्या खेलो इंडियामध्ये निवड झाली आहे.
त्या होंडा हायस्कूल होंडा हायस्कूलच्या खेळाडू आहेत.
त्याच्या यशाबद्दल करंबळ भागातून अभिनंदन होत आहे. खानापूर येथील शिवशक्ती इंटरप्राईजिस यांच्यावतीने अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta