खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेळगाव-गोवा महामार्गावरील ब्रिटीश कालीन कुसमळी पुलाची दुरावस्था झाली आहे.
सध्या कुसमळी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव- गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच या पुलावरून अवजड वाहनाची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यासह पुलाची दुरावस्था झाली आहे.
कुसमळी पुलाची व रस्त्याची दुरावस्था पाहुन कुसमळी गावातील युवकांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजविले. त्यामुळे वाहन चालकाना दिलासा मिळाला.
यावेळी भाजप युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, पंचायत राज्य प्रकोस्ट सहसंचालक अनंत सावंत, भैरव कल्लेहोलकर, आप्पाजी सावंत, अनिल पाटील, विनोद भरणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मलप्रभा नदीवरील कुसमळी पुल हा ब्रिटिशकालीन पुल आहे. त्यामुळे हा पुल जीर्ण झाला आहे.
या पुलावरून आवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. तेव्हा संबंधित खात्याने व तालुका प्रतिनिधी याची लवकरात लवकर दखल घेऊन नविन पुल मंजूर करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta