
खानापूर (विनायक कुंभार) : येथील मराठी प्राथमिक मराठी शाळेची स्वयंपाक खोली शुक्रवारी रात्री कोसळली. काही दिवसांपासून ती मोडकळीस आली होती. तेथील साहित्य वेळीच हलविण्यात आले होते त्यामुळे नुकसान टळले आहे. मराठी शाळेत 107 विद्यार्थी आहेत. याआधीही पटसंख्या अधिक होती. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी मोठ्या स्वयंपाक खोलीची उभारणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून संततधार अतिवृष्टीमुळे जीर्ण झालेल्या इमारतीला तडे पडले होते. शुक्रवारी रात्री उशिरा इमारतीचे छत पुर्णतः कोसळले. याची माहिती गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिली असून त्वरित स्वयंपाक खोलीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी एससीएमसी अध्यक्ष गंगाराम सतार यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta