पीयूसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
खानापूर : विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च कामगिरी करून समाज सुधारावा,शिक्षणाने त्याग, प्रेम, सामाजिक चिंता आणि नैतिकता शिकवली पाहिजे. पदापेक्षा माणसासाठी जे चांगले आहे ती म्हणजे माणुसकी. कठोर परिश्रमाने यश मिळविता येते हा जीवनानुभव आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दीपस्तंभ आहे, असे विचार भाजप नेते महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी शांतिनिकेत काॅलेजच्या पीयूसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन महेश प्री-ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये आयोजित सांस्कृतिक उपक्रम. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. आर. एस. पाटील होते. व्यासपिठावर संस्थेचे खजिनदार विठ्ठल करंबळकर, व इतर मान्यनर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिव प्रा. आर. एस. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आपल्या शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगली कामगिरी करून स्वतःचा व शिक्षण संस्थेचा गौरव करावा. ग्रामदेवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ७५ व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी श्री. अमित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक प्राचार्य प्रसाद एम. पालणकर यांनी केले.
विज्ञान विभाग प्रमुख विशाल व्ही. करंबळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सौ. उज्वला बाचोळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. बी. आर. देसाई यांनी कॉलेज स्टुडन्ट युनियनचे जीएस आणि सदस्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी साक्षी नांदोडकर हिने केले. आभार वाणिज्य विभाग प्रमुख एस. एफ. मोगलानी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta