खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायती मध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन समाजसेवक सदानंद काद्रोळकर व नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी वर्गाचा सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका भाजपा मंडल एससी मोर्चा अध्यक्ष खानापूर तालुका शिवानंद चलवादी व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सोशल मीडिया अध्यक्ष राजेंद्र रायका, सुरेश देसाई व नगरसेवक अपया कोडोली व नारायण ओगले व गुंडू टोपीनकट्टी, अभिजीत चांदिलकर, वासुदेव चौगुले तसेच स्थायी समिती कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, नगरसेवक नारायण मयेकर, लक्ष्मण मादार, विनायक कलाल, हणमंत पुजारी, विनोद पाटील, महमद रफिक, तोहिद चंडकणावर, नगरसेविका मिनाक्षि बैलूरकर, लता पाटील, शोभा गावडे, मेघा कुंदरगी, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी, फतिमा बेपारी सहेेरा सनदी आदी उपस्थित होत्या.
यावेळी नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब मानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समाजसेवक श्री. काद्रोळकर व सफाई कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व मिठाई देऊन सत्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाला खानापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी प्रेमानंद नाईक यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta