खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन गर्लगुंजी गावातील आजी-माजी सैनिकांचा तसेच सेवानिवृत्त पोलिस तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा नंदकुमार निट्टुरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पीडीओ जोतिबा कामकर, उपाध्यक्ष सुरेश मेलगे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत, नंदकुमार निट्टुरकर, तसेच ग्राम पंचायत सदस्य परशराम चौगुले, हणमंत मेलगे, अजित पाटील, प्रसाद पाटील त्याचबरोबर गावचे नागरिक मारुती मेलगे, राजू सिद्दानी, शांताराम मेलगे, संतोष पाटील, मर्याप्पा पाखरे, गोविंद भातकांडे, रमेश कोलकार, ग्राम पंचायत सदस्या अन्नपूर्णा बुरुड, वंदना पाटील, रेखा कुंभार, सविता सुतार, ललिता कोलकार आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत सदस्य प्रसाद पाटील यांनी केले.
गर्लगुंजी गावातील जवळपास 85 आजी-माजी सैनिक, निवृत्त पोलिस व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गावचे नागरिक तसेच सर्व अंगणवाडी शिक्षिका, पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta