खानापूर (प्रतिनिधी) : कापोली (ता. खानापूर) येथील मराठा मंडळ हायस्कूलला इस्रो संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम येथील शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने या भेटीचा आनंद त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘दहावीनंतर आणि पुढे बारावीनंतर काय?’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावीनंतर आपण कोणते विषय अभ्यासले पाहिजेत अभ्यास कसा करावा? स्वतः शास्त्रज्ञ होताना कोणते अभ्यासासाठी उपक्रम राबविले व अभ्यासाची पद्धत कशी होती? ते विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्य कुठलेही असो सातत्याची कास धरल्याशिवाय ध्येय साध्य करता येत नाही. ते जेंव्हाचे तेंव्हाच करा. नाहीतर पदरी निराशाच येते. आणि पश्चाताप करावा लागतो. हा पश्चाताप फलहिनच असतो. तेंव्हा वेळीच स्वतःला सावरा सफलता तुमच्या नक्कीच तुमच्या पदरात पडेल.
आपले शिक्षक संजीव वाटूपकर सरांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करायला ते या प्रसंगी विसरले नाहीत. शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. घुग्रेटकर सर्व सहशिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थीनी या प्रसंगी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta