
खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी प्राथमिक शाळेत सीआरसी केंद्र बरगांवच्या वतीने नूतन बढती मुख्याध्यापक श्री. एन. एस. कुंभार, श्रीमती एन. जे. देसाई व श्रीमती पाटील मॅडम व नूतन सीआरपी श्रीमती कदम मॅडम आणि माजी सीआरपी श्री. गोविंद पाटील सर तसेच सहशिक्षिका श्रीमती धामणेकर मॅडम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. वाय. एम. पाटील सर होते तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
श्री. गोविंद पाटील सर गेली साडेपाच वर्षे सीआरपीची धुरा सांभाळत आहेत. अतिशय उत्तम प्रकारे कार्य करून सर वयाने व नोकरीतील वर्षानेही कमी असले तरी वैचारिक प्रगल्भता व कार्याची प्रगल्भता ही वाखाणण्याजोगी आहे. तंत्रज्ञानात तर कोणाचीही मक्तेदारी न ठेवता सर्व शिक्षकांना तंत्रज्ञान साक्षर करण्याचा सरांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणतेही काम असले तरी वेळेची मर्यादा न ठेवता ते काम पुर्ण करत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला. तात्विक हेवेदावे काही असले तरी वैयक्तिक पातळीवर त्याचा परिणाम न होऊ देता केंद्रातील सर्व शिक्षकांना योग्य सेवा देत अतिशय उत्तम प्रकारे कार्य सरांनी बजावले आहे. गोविंद पाटील सर हलसी शाळेत रुजू झाले आहेत त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta