
खानापूर (विनायक कुंभार) : गोकुळ अष्टमी निमित्ताने गर्लगुंजीतील शाळकरी मुलांनी बाल कृष्ण आणि राधेच्या वेशात गावात फेरी काढली. यावेळी नटून थटून आलेल्या शाळकरी मुलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. कृष्ण वेशभूषा आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. त्यामूळे वातावरण उल्हसित झाले. बालचमुंची ही फेरी पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली.

संपूर्ण श्रावण महिन्यात सण उत्सवांची पर्वणी असते. यात प्रामुख्याने गणेशचतुर्थीच्या काहीं दिवसाआधी येणारा गोकुळ अष्टमी सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. अष्टमीच्या रात्री बाल कृष्णाच्या पाळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीकाला उत्सव होतो. गर्लगुंजीत या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमाचे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुहूर्तमेढीचे कार्यक्रम संपन्न झाले.
Belgaum Varta Belgaum Varta