खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर, बेळगाव भागातील श्रीकृष्ण हणबर गवळी समाज पुण्यात स्थायिक असून या श्रीकृष्ण हणबर गवळी समाजातील बांधवांचा पुण्यातील वारजे माळवाडी येथील कम्युनिटी हॉलमध्ये वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डी. आर. करणुरे सर व सौ. करणुरे, श्रीमती नंदा पाटील, समाजाचे कार्याध्यक्ष रायगोंड चौगुले उपस्थित होते. समाजाच्या मंडळाचे कार्यकर्ते बालचंद्र चौगुले यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविका नारायण गावडे यांनी केले.
यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत नागेश पाटील, ज्ञानेश्वर गावडे, रोहिणी चौगुले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहित पाटील यांनी हणबर समाजाबद्दल माहिती व इतिहास सांगितला.
या कार्यक्रमाला समाजाचे अनेक सभासद सहपरिवार तसेच मित्र परिवारासह उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत मांडले व मार्गदर्शन केले व प्रत्येक परिवाराची माहीती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. राहुल पाटील यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितल चौगुले, अनिता पाटील, नेहा गावडे, सुनिता गावडे, रोहिणी चौगुले, गौतमी चौगुले, निकिता पाटील, अनिकेत गावडे, रितेश पाटील या सभासदांनीही अथक परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta