खानापूर : चापगाव येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. चापगाव येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मिळून रात्रभर भजन व किर्तनाचा कार्यक्रम सादर केला आला. त्यानंतर महाकाला पार पडला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व कृष्णमंदिराचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश धाबाले यांनी केले. तसेच चापगाव ग्रामस्थांनी पंचवीस वर्षांपूर्वी पंढरपूर येथे मंदिर बांधण्यासाठी जागा खरेदी केली आहे. मंदिर बांधणीसाठी देणाी स्वरूपात गावकर्यांनी मदत करा, असे आवाहन यावेळी रमेश धबाले यांनी केले. तसेच मंदिराचा पायाभरणी समारंभ पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी गावकर्यांनी स्वखर्चाने यावे, असे देखील सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी तालुका पंचायत मल्लाप्पा मारिहाळ तसेच गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिराजी कुराडे यांनी केले तर आभार मष्णू चोपडे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta