खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे दर तीन वर्षातून एकदा होणार्या माऊली देवीच्या यात्रेला शुक्रवारी दि. 19 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी दि. 23 रोजी यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेचा प्रारंभ शुक्रवारी दि. 19 रोजी झाला. यावेळी सकाळी 10.30 वाजता गार्हाणे घालून गावची सीम बांधण्यात आली. या पाच दिवसांत तोपिनकट्टी गावात बाहेरील व्यक्ति, पै, पाहूणा, नोकर वर्ग प्रवेश देण्यात आला नाही. तसेच गावातील नागरिकांना गावच्या बाहेर जाता आले नाही. या काळात गावातील दळपकांढप गिरण्या बंद ठेवण्यात आल्या. चार चाकी वाहणे, दुचाकी गावात फिरली नाही.
या काळात गावच्या बाहेर माऊली देवी स्थापना होऊन दररोज संध्याकाळी जत्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकांच्या उपस्थितीत पुजा अर्चा करण्यात आली. उद्या मंगळवारी दि. 23 रोजी गावाच्या सीमेवरती माऊली देवीची पूजा होऊन रात्री गोंधळाचा कार्यक्रम होऊन प्रसादने यात्रेची सांगता होणार, अशी माहिती माजी ग्राम पंचायत अध्यक्ष नारायण गुरव यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta