खानापूर (विनायक कुंभार) : देशातील 60 टक्के हवामान पश्चिम घाटावर अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील जीवसृष्टी जोपासली पाहिजे, असे आवाहन बेळगावातील ग्रीन सॅव्हीयर्सचे समन्वयक समीर मजली यांनी केले. खानापूरमधील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत पर्यावरण जागृती या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज झाली आहे. कारण औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे पर्यावरणाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संस्थेने उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत संस्थेने 33 हजार रोपे लावली आहेत. या उपक्रमात खानापूर तालुक्यातील सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन समीर मजली यांनी केले.
ऍड. चेतन मणेरीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला ग्रीन सॅव्हीयसर्र्च्या सदस्या उज्वला देशपांडे, रक्षा उपाध्ये, संस्थेचे अध्यक्ष जयंत तिनईकर, प्रशासक दीपक सखदेव, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta