खानापूर : खानापूर तालुका दुर्गम असल्याने या भागातील गावांच्या लोकांना खानापूर किंवा बेळगावला जायचे असेल तर अनेक गावातून पहाटे निघणार्या वस्ती बसफेर्या होत्या. पण अलीकडे निम्याहून अधिक गावांच्या वस्ती फेर्या बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
कणकुंबी, गोदगेरी, कापोली, भुरूनकी, मेराड्यासह पूर्व भागांतील हंदूर व बोगूर या गावात पूर्वी वस्ती बस होत्या. त्यामुळे या भागातील लोकांना व विद्यार्थ्यांना पहाटे खानापुराला जात येत होते. मात्र आता या वस्ती बसेस बंद केल्याने सर्वांचेच दिनानित्य कार्य बदलून गेले आहे. बस आगारातून गावात आल्यानंतर खानापुराला जावे लागते. त्यानंतर अन्य इतर ठिकाणी जाता येते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
30 वर्षे निरंतर चालू असलेली गोदगेरी गावाची वस्ती बस बंद झाल्याने गोधोली, नागरागाळी, हलगा, हलशी भागातील लोकांना बेळगावला जाता येत होते. सायंकाळी त्याच बसने परतण्याची व्यवस्था होती. पण दहावर्षापासून बंद असल्याने लोकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. पूर्वी बैलहोंगल आगाराची बैलहोंगल-हलशी बस होती. तसेच कारवार-बेळगांव ही बस फेरी हलसी मार्गे होती. त्या दोन्ही बस फेर्या अचानक बंद केल्या आहेत. मेराड्यासह नंदगड मार्गे कापोलीसाठी असलेली बसफेरीही बंद झाली आहे. तालुक्यातील सर्वाधिक लोक संख्या असलेले नंदगड गावात पूर्वी बेळगाव आगारातून बस येत होती. त्यामुळे येथील नागरिकांना व नोकरीवर्गाला तसेच विद्यार्थ्यांना बेळगावला जाणे सोयीस्कर होते. पण ही बस फेरी बंद असल्याने सर्वांचेच हाल होत आहेत. त्यासाठी याभागातील लोकांच्या समस्येकडे त्वरित लक्ष देवून निवारण करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta