Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर समर्थ इंग्रजी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
प्राथमिक विभागातील अनिकेत सावंत, अथर्व चौगुले यांनी कुस्ती, दोरी उड्या, बॅटमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
तर हायस्कूल विभागातुन दत्तराज पाटील, श्रेया चौगुले, मलप्रभा नांदुरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे त्याची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली.
समर्थ इंग्रजी शाळेचे सचीव डाॅ. डी. ई. नाडगौडा, अध्यक्ष एफ. एम. पाटील, संचालक एन. एल. कदम, अरविंद जोरापूरे, पी. एन. पाटील, सातेरी पुन्नूचे, नारायण चोपडे, सुरज मोरे यांनी अभिनंदन केले.
यावेळी बीईओ राजेश्वरी कुडची, बीआर पी श्री. अंबगी, पीडीओ एस. एल. मिरजे, सीआरपी जनकट्टी आदींनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.
तर विजय खेळाडूना मुख्याध्यापिका व क्रिडा शिक्षक रामचंद्र पाटील व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *