खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावाच्या नाल्यावरील पूल गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याने कुप्पटगिरी गावाला या नाल्यावरून ये-जा होणारी वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे कुप्पटगिरी गावाच्या नागरिकांना खानापूर शहराला जाणारा जवळचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कुप्पटगिरी नागरिकांना अनेक समस्या तोंड द्यावे लागत आहे.
याची दखल घेऊन भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, कृषी पत्तीन सोसायटीचे संचालक शंकर पाटील, ग्राम पंचायत सदस्य भाऊ पाटील, श्रीपती पाटील, केदारी पाटील, नारायण पाटील, परशराम पाटील यांनी नाल्यावरील पूलाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर व कृषी पत्तीन सोसायटीचे संचालक शंकर पाटील यांनी पुलाची दुरावस्था पाहून जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील यांना तात्काळ हा पूल दुरूस्त करावा, अशी सुचना करून लवकरात लवकर कुप्पटगिरी गावच्या नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास आपण प्रयत्नशील राहीन असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta