खानापूर : खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन तसेच खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधून दिला. त्यांना रस्त्याच्या दयनीय परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. अभियंता निलेश कापसे यांनी दुरावस्था झालेल्या रोडची पाहणी केली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती.
दुरावस्था झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या रस्ता अभियंता निलेश कापसे यांना शिंदोली ग्राम पंचायतचे सदस्य प्रा. शंकर गावडा, तालुका ग्राम पंचायत असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, शिंदोळी ग्राम पंचायतचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी होनकल ते रामनगरपर्यंत खराब झालेला रस्ता अभियंता निलेश कापसे यांच्या निदर्शनास आणून दिला. तातडीने रस्ता दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्वरित दखल देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला प्रतिसाद देऊन आज होनकल पासून पुढे रामनगर पर्यंतच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले. ऐन गणेशोत्सव तोंडावर आला असताना रस्ता दुरुस्ती होत असल्यामुळे नागरिकांकडून शिंदोली ग्राम पंचायत तसेच नवीन रस्ता कंपनीचे अभियंता श्री. कापसे यांच्या कामाबद्दल प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …