खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतींचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतीचा पाया भरणी भाजप नेते व श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, करंबळ ग्राम पंचायत उपाध्यक्ष नारायण पाटील, सुरेश देसाई, सदस्य महातेश पाटील, लक्ष्मण तिरवीर, तालुका विकास आघाडी अध्यक्ष भरमाणी पाटील, आदीच्या हस्ते काॅलम भरणी करण्यात आली.
यावेळी बरगाव गावचे नागरिक, पंच मंडळी उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta